दिल्लीतील अलीपूर भागातील एका प्लॅस्टिक कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना शनिवारी घडली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 25 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
आगीत कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याची माहिती अद्याप मिळाली नाही. आगीचे कारणही अद्याप स्पष्ट झालेले नाही. परिसरात आगीचे लोळ उठले आहे. भीषण आग लागल्याने परिसरातील नागरिकांमध्ये एकच गोंधळ उडाला. अग्नीशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे.