राज्यातील 8 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पाहा कोणाची कुठे झाली नियुक्ती…

महायुती सरकारने अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका लावला आहे. आज पुन्हा राज्यातील 8 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. एम.जे. प्रदीप चंद्रन यांची पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

कोणत्या अधिकाऱ्याची कुठे झाली बदली?

– MMRDA चे सह महानगर आयुक्त असलेल्या राधाविनोद शर्मा यांची मीरा-भाईंदर आयुक्तपदी नियुक्त
– मुंबईत अतिरिक्त विकास आयुक्त (उद्योग) असलेल्या एम. जे. प्रदीप चंद्रन यांची पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती
– छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिरिक्त विभागीय आयुक्त असलेल्या बाबासाहेब बेलदार यांची छत्रपती संभाजीनगरमध्ये अल्पसंख्या विकास आयुक्तपदी नियुक्ती
– छत्रपती संभाजीनगर स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश मिनियार यांची जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती
– सोलापूर स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोपीचंद कदम यांची ठाण्याच्या अतिरिक्त आदिवासी आयुक्तपदी नियुक्ती
– मुंबईत MSRDC च्या सह व्यवस्थापकीय संचालक असलेल्या वैदेही रानडे यांची रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती
– नागपुरात विदर्भ विकास महामंडळाचे सचिव असलेले अर्जुन चिखले यांची शुल्क नियामक प्राधिकरणाच्या सचिवपदी नियुक्ती
– यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी पंकज अशिया यांची अहिल्यनगरच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती