मिंधे सरकारकडून आज राज्याचे 2024 चे पर्यटन धोरण जाहीर करण्यात आले. महाविकास आघाडी सरकारने राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी सर्वतोपरी उपाययोजना केल्या होत्या. जवळपास त्याचीच कॉपी मिंधे सरकारने या नव्या धोरणात केल्याचे दिसून येते. पर्यटनातून गुंतवणूक वाढवणे, रोजगार निर्मिती करणे व जलपर्यटनाला अधिक प्रोत्साहन देण्याचा निर्णय तत्कालीन पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतला होता. त्याचीच री मिंधे सरकारने ओढली आहे. दहा वर्षांत 18 लाख रोजगारनिर्मितीचा दावाही मिंधे सरकारने केला आहे.
विशेष पर्यटन क्षेत्र विकसित करणे, क्रूझ पर्यटनाला प्रोत्साहन, महाविशेष पर्यटनस्थळांचा विकास, ग्रामीण पर्यटन आदी विविध संकल्पना राबवल्या जाणार आहे. पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रसिद्धी आणि प्रचार यांवरही शासन भर देणार आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी पर्यटनाच्या प्रचार व प्रसारासाठी सोशल मीडियाचा सर्वाधिक वापर अत्यंत प्रभावीपणे केला होता. मिंधे सरकारचा भर त्याऐवजी कोटय़वधी रुपयांच्या जाहिरातींवर आहे.
नद्यांमध्ये जलप्रवासाला प्रोत्साहन
नर्मदा, गोदावरी, वशिष्ठाr, सावित्री, पृष्णा आणि तापी यांसह अन्य मोठय़ा नद्यांमधून जलप्रवासाला प्रोत्साहन देण्यात येणार आहे. गोदावरी आणि नर्मदा नद्यांमध्ये बारमाही क्रूझ पर्यटन विकसित केले जाणार आहे. चिपळूण येथील वाशिष्ठाr नदीमध्ये स्थानिक प्रवासाची सुविधा विकसित केली जाणार आहे. नंदुरबार येथील तोरणमाळपासून गुजरात येथील स्टॅच्यू ऑफ युनिटीपर्यंत असा गुजरात आणि मध्य प्रदेश या राज्यांची जोडणारा जलप्रवास विकसित केला जाणार आहे.
– कोकणातील पर्यटनाला चालना देण्यासाठी जलमार्ग विकसित करण्यावर या धोरणामध्ये भर दिला आहे. यामध्ये रत्नागिरी जिह्यात वेलदूर, सुवर्णदुर्ग, रायगड जिह्यात काशीद, उंदरी आणि पद्मदुर्ग येथे जेटीची निर्मिती, दुर्गाडी-कल्याण जेटीची निर्मिती यासह अर्नाळा किल्ल्यावर जेट्टीची बांधणी, जंजिरा किल्ला येथे प्रवासी जेटीची निर्मिती अलिबाग, मुरुड-जंजिरा, गणपतीपुळे, तारकर्ली आणि दापोली येथे जाण्यासाठी जलमार्ग विकसित केला जाणार आहे.