पाणी योजनेचा वीजपुरवठा खंडित, खालापूरच्या केळवलीत हंडाभर पाण्यासाठी वणवण

एक लाखाचे वीज बिल थकल्याने महावितरणने खालापूर तालुक्यातील केळवली पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे रखरखत्या उन्हात या गावातील महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.

पाणीपुरवठा योजनेमुळे खालापूर तालुक्यातील केळवली गावकऱ्यांचे पाणी टेन्शन संपले होते. मात्र या योजनेचे एक लाखाचे बिल थकीत असल्याने महावितरणने वीजपुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे गेल्या चार ते पाच दिवसांपासून नळाचे पाणी गायब झाले असून पाण्यासाठी गावकऱ्यांना वणवण करावी लागत आहे. ही समस्या सुटावी यासाठी केळवली गावातील ग्रामस्थ सुनील दिसले, वैभव दिसले, शरद दिसले, अक्षय दिसले, अंकुश मराठे, समाधान दिसले, जयेश कर्णक, चेतन दिसले, प्रशांत दिसले, अमोल दिसले, कल्पेश दिसले यांनी ग्रामविकास अधिकारी महेश म्हसे यांची भेट घेत चर्चा केली