
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद आज गुरुवारी नागपूरमध्ये विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात उमटले. महाविकास आघाडीतर्फे आज नागपूरमध्ये संविधान चौकात आणि विधानभवन परिसरात अमित शहांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. या आंदोलनात सहभागी होऊन महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे, विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना आमदार भास्कर जाधव यांच्यासह काँग्रेस आमदार व माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आदींनी आंदोलन केले.