हुकूमशाही सरकारचा शेतीवर डोळा : विलास औताडे

गेल्या दहा वर्षांपासून केंद्र व राज्य सरकारची जुमलेबाजी सुरू आहे. देशात मोदी, शाह, अदानी, अंबानी यांची हुकूमशाही सुरू आहे. त्यांचा आता शेतकऱ्याच्या शेतीवर डोळा असल्याचा आरोप महाविकास आघाडीचे उमेदवार विलास औताडे यांनी केला. येणारे सरकार महाविकास आघाडीचे असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

फुलंब्री मतदासंघांतील करमाड व लाडसावंगी सर्कलमध्ये विलास औताडे यांचा गावनिहाय दौरा सुरू आहे. यावेळी पिंपळखुटा येथे आयोजित गावभेट दौऱ्यात मंगळवारी ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले, भाजपला विधानसभेच्या निवडणुकीत कायमचे थांबवा. येणारे सरकार हे महाविकास आघाडीचे असणार आहे. त्यामुळे मला मतदासंघांत विकास करण्यासाठी संधी द्या, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी किसानसेनेचे अध्यक्ष नाना पळसकर यांनी महायुती सरकार शेतकऱ्यांना झुलवत ठेवत असल्याचा आरोप केला.

शेती मालाला भाव नाही मात्र खर्च वाढत गेला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी या सरकारला सत्तेतून खेचा असे आवाहन केल. या गावभेट दौऱ्यात आज प्रचाराचा प्रारंभ महाविकास आघाडीचे उमेदवार विलास औताडे यांच्या प्रचाराचा शुभारंभ बोरगाव अर्ज येथे आयोजित करण्यात आला आहे. यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार कल्याण काळे यांची उपस्थिती राहणार आहे. यावेळी महाविकास आघाडीच्या पदाधिकारी, कार्येकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

लाडसावंगी, करमाड सर्कलमधील शेद्रा, कुंभेफळ, टोनगाव, जडगाव, पिंपळखुटा, कांचनपूर, औरंगपूर, लाडसावंगी, सेलूद, हात माळी, नायगव्हण, लामकाना, अंजन डोह, डोनगाव, बोरवाडी, आडगाव सरक, लिंगदरी, सतळा चौका आदी 30 गावांचा भेट दौरा पार पडला. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अशोक शिंदे, माजी पं.स. सभापती कैलास उकिर्डे, शिवाजी भोसले, शकर ठोंबरे, मदन चौधरी, विठ्ठल कोरडे, माजी जि.प. सदस्य सुरेश शिंदे, पंजाब पडुळ, राम शेजुळ, डॉ जब्बार खान, कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.