निवडणूक आली की स्थानिक लोकप्रतिनिधींकडून विकासाचे गाजर दाखवले जाते. प्रत्यक्षात मात्र तालुका विकासापासून कोसो दूर गेला आहे. खोटी आश्वासने देऊन राजकीय पोळी भाजण्याचे काम पंधरा वर्षांपासून सुरु असून आता मतदारांनी त्यांच्या भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश बनकर यांनी केले.
मंगळवारी भवन सर्कलमधील गव्हाली, निल्लोड, कायगाव, गेवराई सेमी, तलवाडा, भवन, बनकिंन्होळा, पळशी, जिवरग टाकळी आदी गावात प्रचार सभा व बैठका घेण्यात आल्या. यावेळी सुरेश बनकर बोलत होते. या सर्कल दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे रंगनाथ काळे, शिवसेनेचे पदमाकर इंगळे, काँग्रेस तालुकाध्यक्ष भास्कर घायवट, ठगणराव भागवत, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा. राहुलकुमार ताठे, शिवसेनेचे तालुका प्रमुख रघुनाथ घरमोडे, रघुनाथ चव्हाण, विठ्ठल बदर, दत्तात्रय पांढरे, नारायण बडक यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रचार दौऱ्यादरम्यान महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी मतदारांच्या भेटी घेत उमेदवार सुरेश बनकर यांनाच मतदान करण्याचे आवाहन केले. यावेळी माजी सरपंच सारंगधर जैवळ, उत्तम (मामा) शिंदे, काकासाहेब फरकाडे, ज्ञानेश्वर वहाटूळे, विलास आहेर, दत्ता मोठे, सुखेदेव जिवरग, ऋषीदंर शिंदे, रवींद्र मगर, मदनसिंग ठाकूर, उत्तम चव्हाण, रावसाहेब गोराडे, सोमनाथ कळम, दत्ता बडक, डॉ. विठ्ठल बकले, सरपंच भाऊसाहेब बडक, काकासाहेब बडक, अरविंद बडक, प्रकाश राजपूत, अंबादास पुंगळे, जगन्नाथ बडक, कृष्णा राऊत यांच्यासह महाविकास आघाडीतील पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.