विक्रोळीत आवाज महाविकास आघाडीचाच, सुनील राऊत यांच्या प्रचारफेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद…

मराठमोळ्या विक्रोळीत आवाज महाविकास आघाडीचाच असून गल्लोगल्ली, घरोघरी शिवसेना उमेदवार सुनील राऊत यांचे दणदणीत स्वागत होत आहे. कुठे हार तर कुठे पुष्पवृष्टी करत त्यांच्या प्रचाराला जोरदार प्रतिसाद मिळत आहे. आज कन्नमवार नगर 1 मध्ये जोरदार प्रचार रॅली काढण्यात आली. आत्माराम सुर्वे मार्ग, एचडीआयएल टॉवर येथून प्रचाराला सुरुवात झाली. ज्ञानेश्वर नगर, कन्नमवार नगर 2 पर्यंत रॅली काढण्यात आली.

लोकांमध्ये मिसळणारा, त्यांच्या प्रत्येक समस्येत तत्परतेने उभा राहाणारा, त्यांच्या एका हाकेला धावून जाणारा आमदार अशी ओळख असलेल्या सुनील राऊत यांना प्रत्येक चौकात, नाक्यानाक्यावर, गल्लोगल्ली, घरोघरी तरुणवर्ग, महिला, ज्येष्ठ नागरिकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. सुनील राऊत यांनी नागरिकांच्या घरोघरी जाऊन भेटीगाठी घेतल्या. प्रत्येक ठिकाणी त्यांचे औक्षण करून, ओवाळून स्वागत करण्यात आले. प्रचाररॅलीदरम्यान त्यांनी दर्शनधाम मंदिरात जाऊन आशीर्वाद घेतले. प्रचारात माजी महापौर, शिवसेना उपनेते दत्ता दळवी, शाखाप्रमुख अभय राणे, प्रकाश पुजारी, विधानसभा प्रमुख परम यादव, उपविभागप्रमुख शेखर जाधव,  विधानसभा संघटक शंकर ढमाले, महिला उपविभाग संघटक रश्मी पहुडकर, शाखा संघटक आसावरी भोईटे, शाखा समन्वयक वंदना बेंद्रे, ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष राहुल वाघदरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिन बोडके, महिला वॉर्ड अध्यक्ष पूजा वस्त यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठय़ा संख्येने सहभागी झाले.

कन्नमावारनगरमधील प्रसिद्ध माई ठेचा वडापाव येथे प्रचारफेरी आली असता सुनील राऊत यांच्यासह कार्यकर्त्यांनी चविष्ठ वडापावचा आस्वाद घेतला. त्यानंतर प्रचाराचा पुढचा टप्पा सुरू झाला. महाविकास आघाडीचे कार्यकर्ते एकदिलाने प्रचार करून मतदारसंघ पिंजून काढत आहेत.