लालबागच्या महात्मा गांधी रुग्णालयात बेकायदेशीर कॅण्टीनचा धोका; तातडीने कारवाई करण्याची मागणी

लालबाग येथील महात्मा गांधी रुग्णालयात बेकायदेशीरपणे मजले वाढवून विद्यार्थ्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली असून धोकादायकरीत्या कॅण्टीन चालवले जात आहे. त्यामुळे या ठिकाणी दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण असा सवाल शिवसेनेचे माजी नगरसेवक अनिल कोकीळ यांनी उपस्थित केला आहे. याबाबत पालिकेने तातडीने कारवाई करावी या मागणीसाठी एफ/दक्षिणच्या सहाय्यक आयुक्तांना पत्र दिले आहे.

महात्मा गांधी रुग्णालयात पीजी हॉस्टेलसाठी इमारत बांधण्यात आल्या आहेत. या ठिकाणी सात माळ्याच्या वर दोन मजले बेकायदेशीरपणे डॉक्टर, कर्मचार्यांना राहण्यासाठी अधिकृत पत्र एमएस गुरुमुखी यांनी दिलेली आहेत. शिवाय तळमजल्यावर कोणतीही परवानगी न घेता , ओसी मिळालेली नसताना इमारतीमध्ये गेल्या तीन वर्षांपासून बेकायदेशीरपणे कॅण्टीन चावले जात आहे. या वैँटीनमध्ये शिळे, खराब पदार्थही पुरवले जात आहेत. शिवाय प्रचंड अस्वच्छता आहे. त्यामुळे या ठिकाणी पालिकेने तातडीने कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी कोकीळ यांनी पालिकेकडे केली आहे.