
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमधून घराघरात लोकप्रिय झालेले कलाकार आता रंगभूमीवर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाले आहेत. प्रसाद खांडेकर, शिवाली परब, ओंकार राऊत, भक्ती देसाई, नम्रता संभेराव, प्रथमेश शिवलकर हे कलाकार ‘थेट तुमच्या घरातून’ या धम्माल विनोदी नाटकातून प्रेक्षकांसमोर येणार आहेत. नुकतेच या नाटकाचे पोस्टर शेअर करण्यात आले असून त्यात या कलाकारांची झलक पाहायला मिळतेय. नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन प्रसाद खांडेकर यांनी केले आहे. लवकरच हे नाटक रंगमंचावर येणार आहे.