महाराष्ट्राच्या मुलींचा संघ दुसऱ्या हॉकी इंडिया ज्युनियर महिला पश्चिम विभागीय स्पर्धेत उपांत्य फेरी गाठणारा पहिला संघ ठरला, मात्र महाराष्ट्राच्या मुलांच्या संघाचा विजयरथ बुधवारी मध्य प्रदेशने रोखला.
राजनांदगाव (छत्तीसगड) आणि सुरत (गुजरात) येथे ही स्पर्धा सुरू आहे. राजनांदगाव येथे महाराष्ट्राने दादरा-नगर हवेली आणि दमण-दीव हॉकी टीमचा 13-0 असा धुव्वा उडवला. खुशी हिचे हॅटट्रिकसह (7 गोल ), तनुश्री कडू (3 गोल), सानिका माने (2) आणि संजना खेतवत (1 गोल) यांची तिला चांगली साथ लाभली. विक्रमी सलग तीन विजयांसह हॉकी महाराष्ट्राने (9 गुण) अंतिम चार संघांमध्ये स्थान पटकावले. त्यानंतर महाराष्ट्र ज्युनियर पुरुष संघाला हॉकी मध्य प्रदेशविरुद्ध 4-7 असा पराभव पाहावा लागला.