
राज्यभरातील वाहनांना हायसिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्यासाठी परिवहन विभागाने 30 जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे. यापूर्वी 30 एप्रिलची मुदत देण्यात आली होती. मात्र राज्यभरात अजून जवळपास 2 कोटी 10 लाखांहून अधिक वाहनांना हायसिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्यात आलेली नाही. ही प्रक्रिया धीम्या गतीने सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन विभागाने 30 जूनची नवीन डेडलाईन निश्चित केली आहे. महाराष्ट्र सरकारने 1एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी केलेल्या वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक अर्थात हायसिक्युरिटी नंबर प्लेट लावणे बंधनकारक केले आहे. राज्यात आतापर्यंत 18 लाख वाहनांनी हायसिक्युरिटी नंबर प्लेट बसवल्याचे सांगितले जात आहे.