शिक्षकांना ‘ड्रेस कोड’

school-teacher

राज्यातील सर्व शिक्षकांना विद्यार्थ्यांप्रमाणे ड्रेस कोड लागू करण्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी शुक्रवारी केली. सध्या शालेय शिक्षकांनी पेहराव कसा करावा, याकरिता मार्गदर्शक तत्त्वे आहेत. मात्र मालेगाव येथील अजंग जिल्हा परिषद शाळेने आपल्या शिक्षकांना लागू केलेल्या ड्रेस कोडमुळे भारावून गेलेल्या भुसे यांनी सर्वच शिक्षकांना राज्यव्यापी गणवेश लागू करण्यात येईल, असे आपल्या भाषणात जाहीर करून टाकले. तसेच त्याकरिता सरकारकडून ‘खारीचा वाटा’ म्हणजे निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. मालेगाव येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते.