महिला आणि बालविकास विभागात 18 हजार 882 पदे भरणार

महिला आणि बालविकास विभागाच्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत राज्यात अंगणवाडी सेविकांची 5 हजार 639 आणि मदतनीसांची 13 हजार 243 अशी एकूण 18 हजार 882 पदे भरण्यात येणार असल्याची माहिती या विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी आज दिली. अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्याशिवाय 14 फेब्रुवारी ते 2 मार्च या कालावधीत मुख्यसेविका या पदाची सरळसेवा आणि निवडीद्वारे 374 पदभरतीची परीक्षा होणार आहे. यापैकी 80 टक्के म्हणजे 102 पदांची सरळसेवेने तर निवडीद्वारे 272 म्हणजेच 100 टक्के पदे भरावयाची आहेत. मुख्यसेविका पदाची परीक्षा पारदर्शक वातावरणात होण्यासाठी आवश्यक ती सर्व कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे तटकरे यांनी सांगितले. तसेच राज्य महिला आयोग, महिला आर्थिक विकास महामंडळ, बालकल्याण समिती, बाल न्याय मंडळातील रिक्त पदांचीही भरती करण्याचे निर्देश तटकरे यांनी दिले आहेत.