
केंद्र सरकारकडून देशाचे एआय धोरण तयार करण्यात येत आहे. त्याच धर्तीवर त्याला सुसंगत असे राज्याचे स्वतंत्र एआय धोरण तयार करण्यात येत आहे. हे धोरण शिक्षण व्यवस्थेला पूरक असेल. त्यात सायबर क्राईम विषयाचाही समावेश करण्याचा विचार असून राज्याचे एआय धोरण साधारण एप्रिलपासून येईल, अशी माहिती व तंत्रज्ञान मंत्री आशीष शेलार यांनी गुरुवारी विधान परिषदेत दिली.