
मुंबईसह राज्यभरात तापमानाचा पारा वाढतच असून विदर्भात तर सूर्यनारायण अक्षरशः कोपला आहे. मुंबईमध्ये तापमान 40 अंश सेल्सिअसखाली नोंदवले जात असले तरी दमट वातावरणामुळे उकाडा वाढत असून अंगाची काहिली होत आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी टोपी, ओढणी आणि गॉगलचा वापर केला जात आहे. विदर्भात उष्णतेच्या झळा जास्त प्रमाणात जाणवत असून नागपुरात पारा 44 अंशांवर पोहोचला असून येथे काही दिवस उष्णता कायम राहील.