एमपीएससी उत्तीर्ण 498 उमेदवारांना अखेर नियुक्ती, शासन आदेश जारी

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातर्फे राज्य सेवा परीक्षेतील गट-अ आणि गट-ब वर्गातील 498 उमेदवारांना नियुक्ती देण्यात आल्या आहेत. यात गट-अ च्या 229 तर गट-ब च्या 269 नियुक्त्या आहे. याबाबतचा शासन निर्णय शुक्रवारी जारी झाला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उमेदवारांचे अभिनंदन केले आहे.

एपीएससीमार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेतून क्लास 2च्या पोस्टसाठी उमेदवारांच्या निवडी झाल्या आहेत. यात उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, पोलीस उपअधीक्षक, सहाय्यक पोलीस आयुक्त, सहाय्यक राज्यकर आयुक्त, गट विकास अधिकारी, मुख्याधिकारी, शिक्षणाधिकारी, बालविकास अधिकारी, उपशिक्षणाधिकारी, कक्ष अधिकारी, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, सहाय्यक गट अधिकारी, सहाय्यक प्रकल्प अधिकारी आदीचा समावेश आहे.

2 एप्रिलला प्रशिक्षणार्थी म्हणून रुजू होणार

प्राप्त अहवाल विचारात घेऊन खालील 229 उमेदवारांना त्यांच्या नावासमोरील रकाना क्रमांक 4 येथे नमूद पदावर 2 एप्रिल 2025 पासून रुजू करून घेण्यात येणार आहे.