महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद करण्याच्या हालचाली सुरू असून सरकारने लॉटरी बंद केली तर लॉटरी विव्रेत्यांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल, असा इशारा महाराष्ट्र राज्य लॉटरी विक्रेता संघटनेने दिला आहे.
मुंबई मराठी पत्रकार संघात संघटनेच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र लॉटरी बंद न करता सहकारी तत्त्वावर चालवण्याची मागणी संघटनेने केली. दरम्यान, विव्रेत्यांना विश्वासात घेऊन राज्य शासनाने लॉटरी सुरू ठेवण्यासाठी उच्चस्तरीय प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करावी तसेच लॉटरी बंद करण्याचा हा प्रस्ताव रद्द करावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य लॉटरी विक्रेता संघटनेचे अध्यक्ष विलास सातार्डेकर यांनी सरकारकडे केली आहे.