विद्यार्थ्यांनो तयारीला लागा! यंदा दहावी-बारावीच्या परीक्षा लवकर होणार, अंतिम वेळापत्रक जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डाकडून दहावी व बारावीच्या परीक्षाचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं. यंदा या परीक्षा दरवर्षीच्या तुलनेत आठ ते दहा दिवस लवकर होत असल्याचे समोर आले आहे. यंदा बारावीची लेखी परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च दरम्यान होणार आहे. तर दहावीची परीक्षा ही 21 फेब्रुवारी ते 17 मार्च दरम्यान होणार आहे. बोर्डाचे सचिव देविदास कुल्हाळ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. विद्यार्थी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डाच्या https://mahahsscboard.in/mr साईटवरून संपूर्ण वेळापत्रक डाऊनलोड करू शकणार आहेत