एसटी कामगारांच्या आर्थिक व महत्त्वाच्या प्रश्नांची सोडवणूक होत नसल्यामुळे अनेक कर्मचारी संघटनांनी एकत्र येत 3 सप्टेंबरपासून राज्यभरात आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे आजपासून पुणे विभागातील सर्व आगारांत एसटी कर्मचाऱ्यांकडून महायुती सरकारविरोधात आंदोलन करण्यात येत आहे. (सर्व फोटो- चंद्रकांत पालकर)
एसटी कर्मचाऱयांना शासकीय कर्मचाऱयांप्रमाणे वेतन मिळावे यासह अन्य मागण्यांबाबत शासन दरबारी अद्याप सकारात्मक निर्णय झाला नसल्याने कर्मचाऱयांकडून प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे.
एसटीच्या संपामुळे राज्यभरातील प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.
ऐन गणेशोत्सवात एसटी कर्मचाऱ्यांकडून संपाची हाक देण्यात आल्याने चाकरमान्यांचेही हाल होणार आहेत.
गणोशोत्सवासाठी आपल्या गावी निघालेल्या चाकरमान्यांना तासंतास एसटी स्टॅंडवर ताटकळत उभे राहावे लागत आहे. याचा परिणाम वयोवृद्धांना देखील होताना दिसत आहे.
दरम्यान बस स्थानकावर प्रवाशांची गर्दी झालेली पाहायला मिळत आहे.
दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीने आर्थिक मुद्द्यांची सोडवणूक तातडीने व्हावी, यासाठी राज्यभरात तीव्र निदर्शन करण्यात आली. मुंबई सेंट्रल येथे कृती समितीच्या वतीने निदर्शने करण्यात आली.