लोकसभा निवडणुकांच्या आधी कांदा निर्यातबंदीचा विषय गाजला होता. कांदा उत्पादकांच्या नाराजी फटकाही महायुतीला बसला. कांद्याच्या मुद्द्यावरून काही सरकारने उलटल्याची काही उदाहरणे आहेत. त्यामुळे राजकारणात कांदा महत्त्वाचा मुद्दा ठरू शकतो. आता विधानसभा निवडणुकाच्या तोंडावरही कांदाप्रश्न चिघळण्याची शक्यता आहे.कांद्याची आयात तातडीने थांबवावी अन्यथा मंत्र्यांच्या गाडीवर कांदे फेकू, असा इशारा शेतकरी संघटनेने दिला आहे. याआधी कांद्याच्या मुद्द्यावरून बच्चू कडू यांनीही महायुतीला फटकारले होते.
अफगाणिस्तानमधून हिंदुस्थानात कांदा आयात केला जात आहे. कांदा प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं महायुतीला इशारा दिला आहे. कांद्याची आयात त्वरित थांबवा, अन्यथा मंत्र्यांच्या गाड्यांवर कांदे फेकू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी दिला आहे. सरकारनं अफगाणिस्तानातून हिंदुस्थानात कांद्याची आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटना आक्रमक भूमिका घेतली आहे. कांद्याची आयात न थांबवल्यास नाशिक व दनगर जिल्ह्यात मंत्र्यांच्या गाड्यांवर कांदे फेकू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.