आपल्याच मंत्र्याला फडणवीसांचा दणका, अतुल सावे यांच्या मंजूर कामांना स्थगिती; कारण काय?

महायुती सरकारमध्ये सध्या स्थगिती सत्र सुरु आहे. आतापर्यंत देवेंद्र फडणवीस हे मिंधे आणि अजित पवार गटाच्या मंत्र्यांना धक्का देत आल्याचं पाहायला मिळालं आहे. मात्र आता त्यांनी आपल्याच मंत्र्याला दणका दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री मंत्री अतुल सावे यांनी मंजूर केलेल्या कामांना स्थगिती दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भाजप आमदार तुषार राठोड यांनी सावे यांची तक्रार मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली होती. याचीच दखल घेत फडणवीस यांनी सावे यांच्या कामांना स्थगिती दिली. याबाबत टीव्ही 9 मराठीने दिलं आहे. .

मंत्री अतुल सावे यांनी नांदेडच्या तांडा वस्तीच्या 7 कोटी 25 लाखांच्या कामांना मंजुरी दिली होती. मात्र तुषार राठोड यांच्या तक्रारीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कमला स्थगिती दिली आहे. सावे यांनी आम्हाला विश्वासात न घेता तांडा वस्तीच्या कामांना मंजुरी दिल्याची तक्रार राठोड यांनी फडणवीस यांना केली होती. यानंतर ही स्थगिती देण्यात आली.