राज्यातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी नागपूरमध्ये संध्याकाळी 4 वाजता होणार आहे. शिंदे गटाच्या 12 आमदारांना फोन गेल्याची माहिती भरतशेठ गोगावले यांनी दिली. या यादीत दीपक केसरकर, तानाजी सावंत आणि अब्दुल सत्तार यांची नावे नाहीत. त्यामुळे त्यांचा पत्ता कट झाल्याचे दिसून येत आहे. घोटाळेबाज, बोलबच्चन गद्दारांना मंत्रिमंडात स्थान दिले नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत 12 डिसेंबर रोजी दिल्लीत मंत्रिपदाची यादी फायनल झाल्याचे सांगीतले जाते. मंत्रिमंडळात कोणाला स्थान मिळाले यापेक्षा कोणाला डच्चू मिळाला, याची चर्चा राजकीय वर्तिळात रंगत आहे. माजी शिक्षण मंत्री दीपक केसरकर, माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार यांचे नाव या मंत्रिमंडळाच्या यादीत नाही. त्यामुळे त्यांचा पत्ता कट झाल्याची माहिती मिळत आहे.
मंत्रिमंडळात वर्णी लागावी यासाठी शुक्रवारी सावंत आणि केसरकर एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी गेले होते. त्यांना पाच तास ताटकळत राहावे लागले. मध्यरात्री त्यांना शिंदे यांनी भेट दिली. तेव्हाच त्यांचा पत्ता कट होणार हे स्पष्ट झाले होते, अशी चर्चाही राजकीय वर्तुळात होत आहे.