महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून आता प्रचार शिगेला पोहचला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी महाराष्ट्रातील धुळ्यात ‘एक हैं तो सेफ हैं’ असा नारा दिला. त्यानंतर त्यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच विरोधकांनीही त्याला चोख प्रत्युत्तर दिले आहे. आता भाजपाच्या या नाऱ्याला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी एक्सवर पोस्ट करत हम सब नेक है…असे जबरदस्त प्रत्युत्तर भाजपला दिले आहे.
‘फोडा, झोडा आणि राज्य करा’ ही भाजपची नीती आहे. आम्ही महाराष्ट्राधर्मावर प्रेम करणारे नागरिक नेक म्हणजेच सभ्य आहोत. या देशात जन्म झालेले सर्व नागरिक एकही आहेत, सेफही आहेत आणि नेकही आहेत, हिच आमची धारणा आहे. राज्यात फूट पाडण्याच्या भाजपच्या डावाला जनता बळी पडणार नाही. महाराष्ट्र धर्मासाठी आम्ही नेकी ठेवून लढणार आणि जिंकणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
हम सब नेक है…
तुमच्या तोडफोडीला, समाजात ‘फोडा, झोडा आणि राज्य करा’ या नितीला आमच्या महाविकास आघाडीकडून ‘हम सब नेक है’ हेच उत्तर आहे.
आम्ही महाराष्ट्राधर्मावर प्रेम करणारे नागरिक नेक म्हणजेच सभ्य आहोत. या देशात जन्म झालेले सर्व नागरिक एकही आहेत, सेफही आहेत आणि नेकही आहेत, हिच…
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) November 11, 2024
एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये जयंत पाटील यांनी म्हटले आहे की,
हम सब नेक है…
तुमच्या तोडफोडीला, समाजात ‘फोडा, झोडा आणि राज्य करा’ या नितीला आमच्या महाविकास आघाडीकडून ‘हम सब नेक है’ हेच उत्तर आहे.
आम्ही महाराष्ट्राधर्मावर प्रेम करणारे नागरिक नेक म्हणजेच सभ्य आहोत. या देशात जन्म झालेले सर्व नागरिक एकही आहेत, सेफही आहेत आणि नेकही आहेत, हिच आमची धारणा आहे.
म्हणूनच तुमच्या समाजात फूट पाडण्याच्या खेळीला आम्ही महाराष्ट्रातील सभ्य नागरिक बळी पडणार नाही…
महाराष्ट्र धर्मासाठी आम्ही नेकी ठेवून लढणार आणि जिंकणार!
असे जयंत पाटील यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.