महाराष्ट्रात महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार रविवारी होत आहे. या सरकारमध्ये भाजपचे 20, मिंधे गटाचे 10 तर अजित पवार गटाचे 9 मंत्री शपथ घेणार असल्याची माहिती मिळत आहे. या शपथविधी समारंभासाठी अनेक आमदारांना फोनही गेले आहे. ज्यांना फोन गेले आहेत, त्यांचा मंत्रिमंडळात समावेश निश्चित समजला जात आहे. मात्र, याआधीच्या महायुती सरकारमध्ये असलेल्या अनेक ज्येष्ठांना अजूनही फोन गेले नाही. त्यामुळे त्यांची धाकधूक वाढली आहे.
नवीन चेहऱ्यांना संधी देण्यासाठी जुन्या नेत्यांना घरी बसवण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. अद्याप फोन आले नसलेल्या बड्या नेत्यांमध्ये अजित पवार गटाचे दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांचा समावेश आहे. तर भाजपच्या सुधीर मुनंगटीवार, रवींद्र चव्हाण यांना अजूनही फोन आलेला नाही. तसेच शिंदे सेनेच्या दीपक केसरकर, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार यांनीही फोन आलेले नाही. त्यामुळे त्यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता कमी झाली आहे.