बदलापुरातील अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणावरून महायुती सरकार आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठत आहे. त्यातच आता माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एक्सवर पोस्ट करत फडणवीसांवर निशाणा साधला आहे. भाजपशी संबंधित प्रत्येक आरोपी फरार कसा होतो? असा सवाल करत त्यांनी पोस्टला #DevachaNyay (देवाचा न्याय) असा हॅशटॅगही दिला आहे.
बदलापूरमध्ये अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणानंतर ‘देवाचा न्याय’ असे बॅनर ठिकठिकाणी दिसत आहेत. त्याचा उल्लेख करत देशमुखांनी फडणवीसांना सवाल केला आहे. एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये देशमुख यांनी म्हटले आहे की, सागर बंगल्यावरचा बॉस आपल्या पाठीशी आहे, हा विश्वास राज्यातल्या बलात्कार्यांना आहे म्हणूनच भाजपचे बलात्कारी नेते हे धाडस करत आहेत. नालासोपाऱ्यात 22 वर्षीय तरुणीवर भाजपच्या पदाधिकाऱ्याने वर्षानुवर्षे अत्याचार केले. आजही हा आरोपी फरार आहे.
सागर बंगल्यावरचा बॉस आपल्या पाठीशी आहे, हा विश्वास राज्यातल्या बलात्कार्यांना आहे म्हणूनच भाजपचे बलात्कारी नेते हे धाडस करत आहेत. नालासोपाऱ्यात 22 वर्षीय तरुणीवर भाजपच्या पदाधिकाऱ्याने वर्षानुवर्षे अत्याचार केले. आजही हा आरोपी फरार आहे.
एक साधा प्रश्न राज्यातील जनतेला पडलाय,… pic.twitter.com/vzDcGNBl7t
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) September 25, 2024
एक साधा प्रश्न राज्यातील जनतेला पडलाय, भाजपशी संबंधित असलेला प्रत्येक आरोपी फरार कसा होतो❓
#DevachaNyay इथे होणारं आहे की नाही!
या पोस्टसह अनिल देशमुख यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. बलात्कार प्रकरणातील एका पदाधिकाऱ्याचे भाजपातून निलंबन करण्यात आल्याचे आणि तो फरार असल्याबद्दलचा हा व्हिडीओ आहे.