EVMमध्ये गडबड, आंतरराष्ट्रीय स्तरावर तपासणी करा; पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे निकाल अनपेक्षित असून महाविकास आघाडीचे नेते सातत्याने ईव्हीएम मशीनवर शंका व्यक्त करत आहेत. जनतेच्या मनातही ईव्हीएमबाबत शंका आहेत. तसेच मोठ्या प्रमाणावर उमेदवार फेरमतमोजणीसाठी अर्ज करत आहेत. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीही ईव्हीएममध्ये गडबड झाल्याची शंका व्यक्त करत आंतरराष्ट्रीय स्तरावर तपासणी करावी, अशी मागणी केली आहे.

विधानसभा निवडणुकीचे निकाल अनपेक्षित आहेत. आपण जवळजवळ सात सार्वत्रिक निवडणुका लढलो आहे. निकालाचा कार्यकर्त्यांना अंदाज येत असतो. लोकशाही वाचवण्यासाठी बाबा आढाव यांनी आंदोलन केले. लोकसभा निवडणुकीत 5 महिन्यांपूर्वी महाविकास आघाडीला चांगले यश मिळा होते. मात्र, पाचच महिन्यात विधानसभेत इतका मोठा बदल होईल असे वाटत नाही. जनतेला बदल हवा आहे, हे स्पष्ट दिसत होते, असेही ते म्हणाले.

EVMमध्ये गडबड आहे. पण याबाबतचा ठोस पुरावा मिळणं कठीण आहे. VVPAT मधील सर्व चिठ्ठ्या मोजा. आंतरराष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञांकडून ईव्हीएम मशीनची तपासणी करायला हवी, हीच आमची प्रमुख मागणी आहे. लोकसभेतील निकाल आणि विधानसभेचा निकाल यात मोठी तफावत आहे. लोकसभा आणि विधानसभेतील मतदानाची टक्केवारी पाहता, हा बदल संशयास्पद आहे, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.