लातूर जिल्ह्यात 6 विधानसभा मतदारसंघात 20 लाख 45 हजार 591 मतदार; प्रशासन सज्ज

लातूर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात 20 लाख 45 हजार 591 मतदार आहेत. 106 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून मतदानासाठी 2 हजार 143 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे.

लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात 18 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. 3 लाख 34 हजार 957 मतदारांची संख्या आहे. लातूर शहर विधानसभा मतदारसंघात 4 लाख 145 मतदारांची संख्या आहे. लातूर शहर विधानसभा मतदारसंघात 23 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मतदानासाठी 389 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे.

अहमदपूर विधानसभा मतदारसंघात 3 लाख 49 हजार 572 मतदार आहेत. या विधानसभा मतदारसंघामध्ये 20 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मतदानासाठी 376 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. उदगीर विधानसभा मतदारसंघात 3 लाख 23 हजार 962 मतदारांची संख्या आहे. उदगीर विधानसभा मतदारसंघात 13 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून, 359 मतदान केंद्रांची व्यवस्था मतदानासाठी करण्यात आली आहे.निलंगा विधानसभा मतदारसंघात 3 लाख 32 हजार 394 एकूण मतदार आहेत. निलंगा विधानसभा मतदारसंघात 13 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून, मतदानासाठी 347 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे.

औसा विधानसभा मतदारसंघामध्ये 3 लाख 4 हजार 761 एकूण मतदार आहेत. औसा विधानसभा मतदारसंघात 19 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून, मतदानासाठी 309 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील मतदान पथकांना भेट देऊन मतदान पथकातील अधिकारी कर्मचार्‍यांशी संवाद साधला.