भ्रष्टयुतीच्या भूलथापांना आता महाराष्ट्र बळी पडणार नाही; नाना पटोले यांचा हल्लाबोल

महाराष्ट्रात भ्रष्ट युतीचे बेकायदा सरकार आहे. महायुती सरकारच्या काळात राज्याची अधोगती झाली आहे. राज्यातील उद्योगधंदे गुजरात पळवण्यात आल्याने बेरोजगारीची मोठी समस्या राज्यासमोर उभी आहे. तसेच दरडोई उत्पन्नात गुजरातने महाराष्ट्राला मागे टाकले आहे, या मुद्द्यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महायुतीवर निशाणा साधला आहे.

नाना पटोले यांनी एक्सवर याबाबत पोस्ट करत त्यांनी महायुतीवर हल्लाबोल केला आहे. त्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, माननीय मुख्यमंत्री @mieknathshinde आणि उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी,

– सकल राज्य उत्पन्न आणि दरडोई उत्पन्नात गुजरातची विशेष प्रगती.
– गुजरातचा वाटा ८ टक्क्यांपेक्षा अधिक.
– दरडोई उत्पन्नात गुजरातने महाराष्ट्राला मागे टाकले.
– तेलंगणा, गुजरात, हरियाणा, तामिलनाडू, पंजाब ही राज्ये महाराष्ट्राच्या पुढे.
– २०१० मध्ये १५ टक्के वाटा असलेल्या महाराष्ट्राची पिछेहाट होऊन हा वाटा १३ टक्क्यांपर्यंत घटला आहे.

गुजरात राज्य स्वबळावर आपली प्रगती करत नसून महाराष्ट्राच्या वाट्याच्या गोष्टी हिरावून आपला विकास साधत आहे. त्यामुळे भाजप सत्तेत राहिल्यास महाराष्ट्र आणि गुजरात ही दोन्ही राज्ये आपला विकसित असल्याचा दर्जा गमावून बसतील. दक्षिणेत भाजपची सत्ता नाही. तिथल्या राज्यांनी प्रगतीची नवी वाट धरल्याचे दिसून येते. गेल्या दशकभरात राज्याची आर्थिक पिछेहाट झाल्याचा निष्कर्ष खुद्द पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने काढला आहे. भ्रष्टयुतीच्या भूलथापांना आता महाराष्ट्र बळी पडणार नाही.

गुजरात राज्य स्वबळावर प्रगती करत नसून महाराष्ट्राच्या हक्काच्या गोष्टी हिरावत त्यांचा विकास होत आहे. महायुतीच्या काळात राज्याची अधोगती झाल्याने भ्रष्टयुतीच्या भूलथापांना आता महाराष्ट्र बळी पडणार नाही,असेही नाना पटोले म्हणाले.