आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सामन्य नागरिकांच्या खिशावर आणखी ताण पडणार आहे. सर्वसामान्यांचा आधार असलेल्या एसटी बसच्या तिकीट दरामध्ये राज्यातील महायुती सरकारने भरमसाठ वाढ केली आहे. राज्य परिवहन महामंडळाने एसटी बसच्या तिकीट दरामध्ये 14.97 टक्के वाढ केली आहे. याच विरोधात आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने राज्यभरात ‘चक्का जाम’ आंदोलन करण्यात येणार आहे. हे आंदोलन मंगळवारी (28 जानेवारी) सकाळी 11.30 वाजता राज्यभरातील जिल्ह्यातील प्रमुख एसटी डेपोजवळ होणार आहे.
एसटी भाडेवाढ लागू, मात्र बेजबाबदार परिवहन मंत्र्यांना कल्पनाही नाही
महायुती सरकारने राज्यात एसटी बसच्या तिकीट दरामध्ये वाढ केली, मात्र बेजबाबदार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना याची कल्पनाही नव्हती. धाराशिव येथे पत्रकार परिषदेत पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला की, भाडेवाडीबद्दल अजित पवार यांना माहित नव्हतं का? यावर सरनाईक म्हणाले की, ”मलाही माहित नव्हतं. मलाही आश्चर्य वाटलं. मी माझ्या अधिकाऱ्यांना विचारलं इतकी मोठी दरवाढ करताय आणि आपल्याला काही माहित नाही. आम्हाला जेव्हा पत्रकारांचे फोन आले तेव्हा कळलं. मग आम्ही सचिवांशी बोललो, त्यांनी सांगितलं हा निर्णय आपण काल मंजूर केला आणि 25 तारखेच्या मध्यरात्रीपासून ही भाडेवाढ लागू होणार.”
एसटी भाडेवाढीविरोधात चक्का जाम!
मंगळवार, दिनांक २८ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ११.३० वाजता
ठिकाणः जिल्ह्यातील प्रमुख एसटी डेपोजवळ. pic.twitter.com/6V2kNzoVGw— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) January 26, 2025