पालघर जिल्ह्यात भूकंपाचा धक्का, सुदैवाने हानी नाही

पालघर जिल्ह्यातील डहाणूमध्ये सोमवारी पहाटे 3.7 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला. पहाटे 4.35 वाजता भूकंपाचा धक्का जाणवले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाले नाही, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष प्रमुख विवेकानंद कदम यांनी सांगितले.

डहाणू तालुक्यातील बोर्डी, दापचरी, तलासरी भागात भूकंपाचा धक्का जाणवला. यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातवारण निर्माण झाले होते. जिल्ह्यात यापूर्वी अधूनमधून भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.

गुजरातमधील कच्छमध्येही शनिवारी भूकंपाचे धक्के जाणवले होते. दुपारी 4.37 वाजण्याच्या सुमारास 3.8 रिश्टर स्केलचे धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्र कच्छमधील दुधईजवळ असल्याचे सांगण्यात आले. यात कोणतेही नुकसान झाले नाही.