महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा, निर्यातीवरील 20 टक्के शुल्क मागे

onion-5

महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून, कांदा निर्यातीवरील वीस टक्के निर्यात शुल्क 1 एप्रिल पासून त्याची अंमलबजावणी होणार त्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यामुळे राज्यातील लाखो कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. केंद्र सरकारकडून कांद्यावरील वीस टक्के निर्यात शुल्क रद्द केल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य दर मिळणार आहे. देशांतर्गत उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी सरकारने यापूर्वी डिसेंबर 2023 ते 3 मे 2024 या कालावधीत निर्यातीवर निर्बंध लादले होते, ज्यामध्ये निर्यात शुल्क, किमान निर्यात किंमत आणि पूर्णतः निर्यातबंदी यांचा समावेश होता. 13 सप्टेंबर 2024 पासून लागू असलेले 20 टक्के निर्यात शुल्क आता रद्द करण्यात आले आहे.