महाराष्ट्राला स्वतंत्र गृहमंत्र्याची आवश्यकता, आनंदराज आंबेडकर यांचं वक्तव्य

राज्याची स्थिती गंभीर होत आहे. मस्साजोग येथील घटना अमानवीय आहे. सोमनाथ सुर्यवंशी यांची कोठडीत हत्याच झाली. सीबीआय मार्फत चौकशी झाली पाहिजे. राज्याला पुर्णवेळचा गृहमंत्री आवश्यक आहे, असं वक्तव्य रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांनी केले. लातूर येथे पत्रकार परिषदेतबोलताना ते असं म्हणाले.

मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या अमानवीय आहे. मी उद्या सकाळी तीथे भेट देणार आहे. सोमनाथ सुर्यवंशी यांचा पोलीस कोठडीमध्ये मृत्यू झाला. तीही हत्याच आहे, मारहाणीत तो मरण पावला. दोन्ही घटनांची सीबीआय मार्फत चौकशी झाली पाहिजे किंवा न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे, अशी आमची त्यांनी केली आहे.

राज्यातील वातावरण खराब होत आहे. अधीही स्फोट होईल, अशी स्थिती निर्माण झाली आहे. जाती जातीमध्ये वाद धुमसत आहेत. एक दिवस याचा उद्रेक होईल. राज्याला पुर्ण वेळ गृहमंत्री आवश्यक आहे. मुख्यमंत्री व त्यांच्या नेत्यांनी राज्याला पुर्णवेळचा गृहमंत्री द्यावा, अशी मागणी ही आनंदराज आंबेडकर यांनी केली. देशाच्या गृहमंत्र्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जे बोलले, हे देशाचे दुर्भाग्य आहे. बाबासाहेबांचा विचार हा देशाचा विचार आहे ,असेही त्यांनी सांगितले.