Maharashtra MLC Election Live Update : शिवसेनेचे उमेदवार मिलिंद नार्वेकर विजयी, मिळाली 24 मतं

विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक होत असून या निवडणुकीत 12 उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे कोणाची विकेट पडणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेल्या यशाची छाप निश्चितच या निवडणुकीतही पडणार याची जाणीव महायुतीला झाली आहे. आपले सर्व आमदार एकत्रित ठेवण्याचे आव्हान भारतीय जनता पक्षासह महायुतीसमोर आहे, तर दुसरीकडे मिंधे गट आणि अजित पवार गटाची आपल्या मतांची वजाबाकी टाळण्यासाठी धडपड सुरू आहे. त्यासाठी त्यांनी हॉटेल पॉलिटिक्सचा आधार घेतला आहे. तिसरा उमेदवार रिंगणात उतरवून चुरस वाढवणाऱ्या महाविकास आघाडीला मात्र आपले तीनही उमेदवार निवडून येतील अशी खात्री आहे.

 

विधान परिषद निवडणुकीचे निकाल –

शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार मिलिंद नार्वेकर विजयी

  • काँग्रेसच्या उमेदवार प्रज्ञा सातव विजयी
  • राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार शेकापचे जयंत पाटील पराभूत
  • भाजपचे विजयी उमेदवार – पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत, योगेश टिळेकर, परिणय फुके, अमित गोरखे
  • अजित पवार गटाचे विजयी उमेदवार – राजेश विटेकर, शिवाजीराव गर्जे
  • शिंदे गटाचे विजयी उमेदवार – भावना गवळी, कृपाल तुमाने

वाचा क्षणाक्षणाचे लाईव्ह अपडेट –

  • सर्व 274 आमदारांचं मतदान पूर्ण, आता उत्सुकता निकालाची
  • 270 आमदारांचं मतदान पूर्ण, 4 आमदारांचं मतदान बाकी
  • काँग्रेसच्या सर्व 37 आमदारांनी केले मतदान, भाजपचे गणपत गायकवाड वेटिंगवर
  • आतापर्यंत 246 आमदारांनी बजावला मतदानाचा हक्क
  • काँग्रेसच्या 30 आमदारांनी आतापर्यंत केलं मतदान
  • राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या 12 आमदारांनी केलं मतदान
  • शिवसेनेचे आमदार मतदानासाठी विधानभवनाकडे रवाना
  • गणपत गायकवाड यांना मतदानाची परवानगी. भाजपकडून सत्तेचा गैरवापर – अनिल देशमुख

देशमुखांना एक न्याय अन् गणपत गायकवाड यांना वेगळा न्याय का? विरोधक आक्रमक, सत्तेचा दुरुपयोग असल्याचा आरोप

  • विकेट कुणाची जाणार सांगता येत नाही, पण महाविकास आघाडीचे तिन्ही उमेदवार निवडून येणार – रवींद्र धंगेकर
  • विधान परिषदेसाठी आतापर्यंत 35 हून अधिक मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क
  • भाजप आमदार गणपत गायकवाड यांना मतदानापासून रोखा; काँग्रेसने निवडणूक अधिकाऱ्यांनी लिहिले पत्र

  • महाविकास आघाडीचे तिन्ही उमेदवार विजयी होतील! – संजय राऊत

सत्ता, पैसा त्यांच्याकडे; पण लोकमत आमच्याकडे, महायुतीचेही आमदार फुटू शकतात! – संजय राऊत

  • पावसामुळे मतदानाचा कालावधी एक तासाने वाढवा, मिलिंद नार्वेकर यांची मागणी
  • विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात, विविध पक्षाचे आमदार विधिमंडळात दाखल
  • महाविकास आघाडीचे उमेदवार –
    मिलिंद नार्वेकर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), जयंत पाटील (शेकाप) आणि डॉ. प्रज्ञा राजीव सातव (काँग्रेस)
  • महायुतीचे उमेदवार –
    पंकजा मुंडे, अमित बोरखे, परिणय फुके, सदाभाऊ खोत आणि योगेश टिळेकर (भाजप), कृपाल तुमणे आणि भावना गवळी (मिंधे गट), शिवाजीराव गरजे आणि राजेश विटेकर (अजित पवार गट)
  • काँग्रेसने व्हिप जारी करत आमदारांना महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदानाच्या सूचना दिल्या