आरे केंद्रांवर सहउत्पादने विकण्यास परवानगी द्या! महाराष्ट्र दूध वितरक सेनेची सरकारकडे मागणी   

मुंबईतील आरे केंद्रांवर सहाय्यक कर्मचारी नेमण्याची परवानगी द्या, आरे केंद्रांचे हस्तांतरण न करता आरे केंद्रांवर महानंदच्या दुधाची विक्री करावी आणि सर्व आरे केंद्रांवर सहउत्पादने विकण्याची परवानगी द्या, अशी मागणी महाराष्ट्र दूध वितरक सेनेने राज्य सरकारकडे केली आहे.

महाराष्ट्र दूध वितरक सेनेच्यावतीने प्रमुख तीन मागण्यांचे निवेदन प्रधान सचिवसह दुग्ध विकास आयुक्त, महाव्यवस्थापकांना देण्यात आले आहे. वृद्ध पेंद्रधारकांना मदतनीस नेमण्याची परवानगी देऊन त्यांना दिलासा द्यावा, आरे केंद्रांवर महानंद दुग्ध शाळेचे दूध विकण्याची परवानगी द्यावी, त्यामुळे आरे केंद्राचे हस्तांतरण करण्याची गरज पडणार नाही.  त्याचबरोबर आरे सहउत्पादने रॉयल्टी तत्त्वावर विक्रीला परवानगी द्यावी,  अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. लेखी निवेदन देताना महाराष्ट्र दूध वितरक सेनेचे कार्याध्यक्ष राम कदम, कोषाध्यक्ष विलास भुजबळ, सतीश सावंत, तानाजी आरज, रवींद्र पाष्टे यांनी आले आहे.