महाराष्ट्र लॉटरी बंद होणार नाही!

महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद करण्याचा कोणताही प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन नाही. महाराष्ट्र राज्य लॉटरी नियमितपणे सुरू आहे, असे लेखी उत्तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रश्नोत्तराच्या तासाला दिले. विधान परिषद सदस्य सुनील शिंदे यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. समाजातील मटका व जुगार या व्यसनांना प्रतिबंध घालून त्यातून जनसामान्यांची फसगत टाळण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली महाराष्ट्र राज्य लॉटरी आता बंद करण्याबाबतचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे. त्यामुळे राज्यातील लॉटरी विव्रेते चिंतेत आहेत. त्याचा फटका 20 हजारांहून जास्त मराठी कुटुंबांना बसणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद करण्याबाबतचा प्रस्ताव विचाराधीन असल्यास तो रद्द करावा, अशी मागणी सदस्य सुनील शिंदे यांनी केली होती.