सीमाप्रश्नी समन्वयक त्र्यांच्या यादीतून अजित पवारांना डावलले

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटी चालकाला कर्नाटकात मारहाण झाल्यानंतर महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न पुन्हा एकदा पेटला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आज सीमाप्रश्नी दोन समन्वयक मंत्र्यांची नियुक्ती जाहीर केली. समन्वयक मंत्री म्हणून उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील तसेच पर्यटनमंत्री शंभुराज देसाई यांची नेमणूक करण्यात आली आहे. समन्वयक मंत्र्यांच्या यादीत उपमुख्यमंत्री  अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला स्थान मिळालेले नाही.

राज्य सरकारने  2015 पासून सीमाप्रश्नी समन्वयक मंत्र्यांची नेमणूक करण्यास सुरुवात केली. 2024 च्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुतीचे सरकार आल्यानंतर आता नव्याने समन्वयक मंत्री नेमण्यात आले आहेत. सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात दाखल असलेल्या दाव्याचा प्रभावी पाठपुरावा करणे, सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारची बाजू मांडण्यासाठी नियुक्त केलेले वकील तसेच महाराष्ट्र एकीकरण समिती यांच्याशी समन्वय साधणे, वादग्रस्त सीमा भागातील मराठी भाषिक जनतेचे विविध प्रश्न सोडविणे आदी जबाबदारी समन्वयक मंत्र्यांवर सोपविण्यात आली आहे.