Video – महाराष्ट्रात एकाच, तर झारखंडमध्ये दोन टप्प्यात निवडणूक; 23 नोव्हेंबरला निकाल


दिल्लीतील विज्ञान भवन येथे केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद सुरू आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी महाराष्ट्रासह झारखंड विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये 288 मतदारसंघासाठी एकाच तर झारखंडमध्ये 81 जागांसाठी दोन टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

वाचा सर्व लाईव्ह अपडेट…

  • झारखंडमध्ये दोन टप्प्यात निवडणूक, 13 आणि 20 नोव्हेंबरला मतदान, 23 नोव्हेंबरला निकाल
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख 29 ऑक्टोबर, अर्ज छाननीची तारीख – 30 ऑक्टोबर, अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 4 नोव्हेंबर
  • 288 विधानसभा मतदारसंघासाठी 20 ऑक्टोबर रोजी अधिसूचना जारी होणार
  • महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणूक; 20 नोव्हेंबरला मतदान, 23 नोव्हेंबरला निकाल
  • गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना वृत्तपत्रामध्ये तीन वेळा माहिती द्यावी लागणार.
  • मतदान केंद्रावर जाऊ न शकणाऱ्यांना घरून मतदान करण्याची सुविधा
  • ज्य़ेष्ठ नागरिकांसाठी मतदान केंद्रावर बसण्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था करण्यात येणार
  • झारखंडमध्ये 29 हजार 562 मतदान केंद्र आहेत.
  • 66.84 लाख तरुण मतदार असून 11.84 लाख मतदार पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
  • झारखंडमध्ये एकूण मतदारांची संख्या 2.6 कोटी असून यातील 1.29 कोटी महिला आणि 1.31 कोटी पुरुष आहेत.
  • झारखंडमध्ये 24 जिल्हे असून 81 मतदारसंघ आहेत. यापैकी 44 जनरल, 28 एसटी आणि 9 एससीसाठी राखीव आहेत.
  • महाराष्ट्रात 1 लाख 186 मतदार केंद्र आहेत.
  • तरुण मतदारांची संख्या 1.85 कोटी आहे, यातील 23.93 लाख मतदार पहिल्यांदा मतदान करणार आहेत.
  • महाराष्ट्रात 9.63 कोटी मतदार आहेत. यातील 4.97 कोटी पुरुष, 4.66 कोटी महिला मतदार आहेत.
  • महाराष्ट्रात 36 जिल्हे असून 288 मतदारसंघ आहेत. यातील 234 मतदारसंघ जनरल, तर 25 मतदारसंघ स्केड्यूल कास्ट आणि 29 एससीसाठी आहेत.
  • हिंसाचाराची एकही घटना घडली नाही. एकही लाठी चालली नाही, एकही गोळी चालली नाही.
  • हरियाणा आणि जम्मू-कश्मीरमधील सर्व मतदारांचे आभार
  • निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद सुरू