![hsc-exam-paper](https://www.saamana.com/wp-content/uploads/2018/02/hsc-exam-paper-696x447.jpg)
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणारी बारावीची परीक्षा उद्या दिनांक 11 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. राज्यातून या वर्षी या परीक्षेसाठी 15 लाख 5 हजार 37 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. मुंबई, कोकण, पुणे, कोल्हापूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, लातूर, अमरावती, नागपूर, या नऊ विभागीय मंडळांत ही परीक्षा होणार आहे. 18 मार्चपर्यंत कला, विज्ञान, वाणिज्य, टेक्निकल सायन्स आणि किमान कौशल्य आधारित अभ्यासक्रमांसाठी परीक्षा होईल.