पाच आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

भारतीय प्रशासन सेवेतील पाच सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या महाराष्ट्र सरकारने मंगळवारी केल्या. बी. एच. पालवे यांची बदली व्यवस्थापकीय संचालक राज्य वित्त महामंडळ या पदावर करण्यात आली आहे. तर मनोज रानडे यांची पालघर जिल्हा परिषद मुख्याधिकारी या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. शुभम गुप्ता विदर्भ वैधानिक विकास मंडळ, अंजली रमेश यांची हिंगोली जिल्हा परिषद मुख्याधिकारी तर झेनिथचंद्र देवंथुला यांची बदली नांदेड येथे प्रकल्प अधिकारी या पदावर करण्यात आली आहे.