अपघातग्रस्त रुग्णांना एक लाख रुपयांपर्यंत कॅशलेस उपचार

राज्यात अपघातग्रस्त रुग्णांना एक लाख रुपयांपर्यंत कॅशलेस उपचार उपलब्ध करून देण्यात येणार आहे. राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तसेच आयुष्यमान भारत आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनांतील रुग्णालयांची संख्या वाढवणे. जनतेसाठी योजनेतील रुग्णालयांची माहिती, बेडची उपलब्धता आणि तक्रारी नोंदविण्यासाठी स्वतंत्र मोबाईल अॅप तयार करण्याचे निर्देश आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर यांनी बैठकीत दिले.