
महायुती सरकारमधील मंत्र्यांच्या विशेष ओएसडी नेमणुकीबाबतचा शासनाचा आदेश जारी करण्यात आला आहे. यात कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासह एकूण सात मंत्र्यांचे ओएसडी आणि खासगी सचिवांच्या नियुक्तीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. यातच मंत्री गणेश नाईक, मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री आशिष शेलार, मंत्री माणिकराव कोकाटे आणि बाबासाहेब पाटील यांच्याकडे विशेष कार्य अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच मंत्री जयकुमार रावल आणि इंद्रनील नाईक यांच्या खासगी सचिवांची नियुक्तीचे आदेशही जारी करण्यात आले आहेत.