Ratan Tata passed away – राज्यात एक दिवसाचा दुखवटा जाहीर, पार्थिवावर शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

देशाचे उद्योगमहर्षी आणि पद्मविभूषण रतन टाटा यांचे बुधवारी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर राज्य सरकारने एक दिवसाचा शासकीय दुखावटा पाळण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात घोषणा केली आहे. या काळात राज्यातील शासकीय कार्यालयांवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरविण्यात येतील तसेच मनोरंजन किंवा करमणुकीचे कुठलेही कार्यक्रम होणार नाहीत.

हे वाचा – फोर्ड कंपनीच्या मालकाने रतन टाटा यांची उडवलेली खिल्ली, अशा प्रकारे टाटांनी दाखवला मनाचा मोठेपणा

हे वाचा – देश कधीच विसरू शकणार नाही रतन टाटा यांनी केलेली ‘ही’ पाच कामे

रतन टाटा यांनी मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. रात्री साडे अकराच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. रात्री दोनच्या सुमारास त्यांचा पार्थिव रुग्णालयातून घरी नेण्यात आले. गुरुवारी सकाळी 10 ते सायंकाळी 3.30 पर्यंत त्यांचे पार्थिव मुंबईतील नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स (एनसीपीए) मध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर वरळी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येईल.

रतन टाटा हे टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांचे पणतू होत. 1990 ते 2012 पर्यंत टाटा समूहाचे अध्यक्ष आणि ऑक्टोबर 2016 ते फेब्रुवारी 2017 पर्यंत हंगामी अध्यक्ष होते. टाटा समूहाच्या चॅरिटेबल ट्रस्टच्या प्रमुखपदाची धुरा त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत सांभाळली.

Ratan Tata – टाटा म्हणजे विश्वास!