महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता

महाराष्ट्रासमोर नवे संकट उभे राहणार आहे. उष्णतेची लाट असताना पुढील 48 तासांत वादळी वाऱयासह अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. यावेळी 50 ते 60 किमी वेगाने वारे वाहू शकतात.

विदर्भातील अनेक जिह्यांना अतिवृष्टीचा तडाखा बसू शकतो. अनेक जिह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. अमरावती, वाशीम, नागपूर आणि गडचिरोली या जिह्यांना ‘यलो अलर्ट’ म्हणजेच वादळवाऱ्यासह मुसळधार तर वर्धा, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया या जिह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’ म्हणजे अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून नागपूरसह विदर्भातील अनेक जिह्यांमध्ये ढगाळ वातावरण आहे.