भाजपचे माजी केंद्रीय कपिल पाटील यांच्या कट्टर समर्थक स्नेहा पाटील यांनी भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी त्या उमेदवारी अर्ज दाखल करणार असून मोठे शक्तीप्रदर्शनदेखील यानिमित्ताने करण्यात येणार आहे. त्यामुळे भिवंडीत मिंध्यांना टेन्शन आले आहे.
भिवंडी ग्रामीणमध्ये मिंचे गटाचे शांताराम मोरे हे विद्यमान आमदार असून जाहीर झालेल्या पहिल्या यादीमध्ये त्यांचे नाव नाही. त्यामुळे आधीच भीतीचा गोळा त्यांच्या पोटात आला असतानाच आता भाजपच्या स्नेहा पाटील या रिंगणात उतरणार आहेत, पाटील या काल्हेर ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच असून त्यांच्या भूमिकेमुळे मिंधे गट हादरला आहे.
जिल्हाध्यक्ष मधुकर मोहपे यांना हटवले; मुरबाडमध्ये भाजपमधील अंतर्गत कलह विकोपाला
मुरबाड लोकसभा निवडणुकीपासून मुरबाडमध्ये भाजपमधील अंतर्गत कलह मिटण्याऐवजी आता आणखीनच वाढ आहे. विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाल्यानंतर भाजपचे ठाणे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष मधुकर मोहपे यांना अचानक पदावरून हटवण्यात आले. मोहपे हे माजी मंत्री कपिल पाटील यांच्या गटाचे आहेत. अचानक झालेल्या या कारवाईमुळे आमदार किसन कथोरे यांचा गट खूश झाला असला तरी कपिल पाटील यांच्या समर्थकांमध्ये संतापाचा भडका उडाला आहे. त्याचा जोरदार फटका कथोरे यांना विधानसभा निवडणुकीत बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मधुकर मोहपे हे उच्चशिक्षित व कुणबी भूमिपुत्र आहेत. गेल्या दोन वर्षांपासून त्यांना या पदावरून हटविण्यासाठी हालचाली सुरू होत्या. किसन कथोरे यांच्या गटाने जोरदार मोर्चेबांधणी केली होती. मात्र त्यांना पदावरून हटवले गेले नाही. त्यामुळे मुरबाड विधानसभा मतदारसंघातील भाजप कार्यकर्ते नाराज झाले आहेत, मात्र बदलापूर येथे झालेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात झटापट झाली आणि या वादाचे कारण पुढे करून मोहये गांना जिल्हाध्यक्ष पदावरून हटवण्यात आले आहे. या कारवाईनंतर कपिल पाटील यांच्या समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे. याच नाराजीचा फटका कथोरे यांनी विधानसभा निवडणुकीत बसणार आहे.
भाईंदरमध्ये आचारसंहितेची ऐशी की तैशी; भाजप आमदार गीता जैन यांच्या भावासह जिल्हाध्यक्षावर गुन्हा
उल्हासनगरातील कॉलेज, डॉक्टरांवर निवडणूक जनजागृतीची जबाबदारी
विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी महापालिकेने कंबर कसली असून शहरातील ४ नामवंत कॉलेज व डॉक्टरांवर जनजागृतीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. महानगरपालिकेतील अधिकारी, कर्मचारी, सफाई कर्मचारी मतदान जनजागृतीची शपथ घेतली असून विद्यार्थीही मोहिमेत सहभागी झाले आहेत. आयुक्त विकास ढाकणे, स्वीप नोडल अधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त किशोर गवस यांनी स्थायी समिती सभागृहात जनजागृतीची रूपरेषा ठरवण्यासाठी बैठक आयोजित केली होती. त्यात चांदीबाई कॉलेज, आरकेटी कॉलेज, एसएसटी कॉलेज आणि बेदांत कॉलेजचे प्राध्यापक, विद्यार्थी यांच्यासह सहाय्यक आयुक्त विशाल कदम, मयुरी कदम, जनसंपर्क अधिकारी छाया डांगळे, डॉक्टर संघटनांचे प्रतिनिधी, दिव्यांग अधिकारी, समाजसेविका उपस्थित होते. या बैठकीत विकास ढाकणे, किशोर गवस यांनी सर्व सदस्यांनी निवडणूक जनजागृतीनिमित्ताने विविध उपक्रमांद्वारे मतदान टक्केवारी वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश उपस्थितांना दिले.
Maharashtra election 2024 – भाजपच्या स्नेहा पाटील रिंगणात; भिवंडीत मिंध्यांना टेन्शन