मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे! पंतप्रधानांच्या सभेत गोंधळ, व्हीव्हीआयपी रांगेत तरुणाची घोषणाबाजी; सुरक्षारक्षकांची धावपळ

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणावेळी तरुणाने घोषणाबाजी केली. मराठा आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही, मराठा आरक्षण द्यावेच लागेल, अशी घोषणाबाजी करीत व्हीव्हीआयपी रांगेत बसलेल्या तरुणाने गोंधळ घातला. सुरक्षिततेसाठी तैनात असलेल्या पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेत त्याला पोलीस ठाण्यात नेले.

महायुती उमेदवारांच्या प्रचारानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी स. प. महाविद्यालयातील प्रांगणात आयोजित सभेला संबोधित करीत होते. त्याचवेळी अतिमहत्त्वाच्या रांगेत बसलेल्या एका तरुणाने उभे राहत थेट घोषणाबाजी केली. मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे, मराठा आरक्षण घेतल्याशिवाय शांत बसणार नाही, अशी घोषणाबाजी त्याने केली. तरुणाने मोदींच्या दिशेने हातवारे करून घोषणाबाजी केल्यामुळे सुरक्षारक्षकांची तारांबळ उडाली. लागलीच आजूबाजूच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित तरुणाला खाली बसण्यास प्रवृत्त केले. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या घोषणेमुळे आजूबाजूचेही लोक, कार्यकर्ते उभे राहिल्यामुळे गोंधळ निर्माण झाला. मात्र, मोदींनी गोंधळाकडे दुर्लक्ष करीत भाषण सुरूच ठेवले.

तरुणाचे पिवळे जॅकेट अन् व्हीव्हीआयपी रांग

मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे-पाटील दीड वर्षापासून आरक्षणाची लढाई लढत आहेत. त्यामुळे राज्यभरातील मराठा एकवटला असून, आरक्षणासाठी योगदान देत आहे. त्यातूनच पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत मराठा तरुणाने घोषणावाजी करत मराठा आरक्षणाच्या मुद्द्याकडे लक्ष वेधले. मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे म्हणत पिवळ्या रंगाचं जंकिट घातलेला तरुण आक्रमक झाल्याने पोलिसांची बांदल उडाली. पोलिसांनी त्या व्यक्तीला आवरत खाली बसवले.

शरद पवार यांच्यावर बोलणे टाळले

काँग्रेस पक्षावर हल्ला चढवताना पंतप्रधान मोदींनी शरद पवार यांच्यावर मात्र चकार शब्द काढला नाही. त्यामुळे मंचावर असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुटकेचा निःश्वास टाकला. लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेचा सर्वाधिक फटका हा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला बसल्याचे विश्लेषण राजकीय जाणकारांनी केले होते. आजच्या सभेत नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांवर टीका न केल्याने याची चर्चा आता राज्यभरात रंगायला सुरुवात झाली आहे. लोकसभा निवडणुकीवेळी उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत मोदींनी पवारांना भटकती आत्मा असे नाव न घेता संबोधले होते. मात्र, त्यांचे हे विधान महाराष्ट्रातील जनतेला आवडले नव्हते.

मोदींमुळे ‘हवाई’ ताप! हेलिकॉप्टरना उड्डाणाची परवानगी नाकारली, विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या प्रचारात अडथळे

कर्नाटकातील पैसा महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी

कर्नाटक राज्यात खोटा प्रचार करून काँग्रेसने मते मागितली होती. काँग्रेसची सत्ता आल्यानंतर हात वर केले, कनार्टकात काँग्रेस लोकांना लुटत आहे. आर्थिक लूट ही महाराष्ट्रात पाठवून निवडणूक लढविली जात आहे. महाराष्ट्राला वाचविण्यासाठी काँग्रेस नावाचे संकट दूर ठेवले पाहिजे, असा घणाघात पंतप्रधान मोदी यांनी केला.

मराठीतून भाषणाची सुरुवात; पुण्याचा विकास गौरवाची गाथा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून भाषणाला सुरुवात करीत, आमचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांना नमन करतो. अष्टविनायकाला नमन करतो. पुण्यातील लाडक्या बहीण आणि भावांना माझा प्रणाम, असे ते म्हणाले. पुण्यात पुढील पाच वर्षे विकासाची नवीन उड्डाण करण्याची असतील, असे त्यांनी सांगितले. पुण्यातील ऑटोमोबाईल, मेट्रो जाळे, रिंगरोड, मिसिंग लिंक प्रकल्प, पालखी मार्ग या विकासकामांमुळे नागरिकांना फायदा होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

पुन्हा बॅगेची तपासणी, उद्धव ठाकरे अधिकाऱ्यांना म्हणाले…