Maharashtra election 2024 – लढू, जिंकू आणि सरकार बनवू; निवडणुकीची घोषणा होताच संजय राऊत यांचा शंखनाद

sanjay-raut

केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा केली. निवडणुकीची घोषणा होताच राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. महाराष्ट्रात 288 जागांसाठी एकाच टप्प्यात निवडणूक होणार आहे. 20 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल, तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होऊन निकाल लागेल. निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी शंखनाद करत लढू, जिंकू आणि सरकार बनवू अशी प्रतिक्रिया दिली आहे.

माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, लोकसभेपेक्षाही विधानसभेला महाविकास आघाडीचा स्ट्राईक रेट चांगला असेल. कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात सरकार बदलणार आहे. मोदी, शहा आणि सर्वोच्च न्यायालयाच्या समर्थनाने जे घटनाबाह्य सरकार बसवण्यात आले त्याला जनताच पायउतार करेल.

हे वाचा – सत्ताधाऱ्यांच्या सहकार्यानं निवडणुकीच्या तारखा ठरल्यात; उमेदवारांपर्यंत ‘पहिला हप्ता’ही पोहोचलाय, संजय राऊत यांचा घणाघात

महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची महाविकास आघाडी असून आम्ही लोकसभेला एकजुटीने लढलो, तसेच विधानसभेलाही लढू, असेही संजय राऊत म्हणाले. जागावाटपाच्या प्रश्नावर बोलताना राऊत म्हणाले की, हा आकड्यांचा खेळ नसून जिंकण्याचा खेळ आहे. जो जिंकेल त्याची जागा असे सूत्र असून आम्ही लढू, जिंकू आणि सरकार बनवू, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Maharashtra election 2024 Live – महाराष्ट्रात एकाच, तर झारखंडमध्ये दोन टप्प्यात निवडणूक; 23 नोव्हेंबरला निकाल

दरम्यान, निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी ईव्हीएम फूलप्रुफ असल्याचे म्हटले. मात्र ईव्हीएम फूलप्रुफ नसून हरियाणातील निवडणुकीनंतर पुन्हा एकदा ईव्हीएमबाबत लोकांच्या मनात शंका निर्माण झाल्या आहेत. हरियाणासंदर्भात काँग्रेसने जे मुद्दे उपस्थित केले त्यावर निवडणूक आयोगाने खुलासा केलेला नाही, असे राऊत म्हणाले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)