भाईंदर विधानसभा निवडणुकीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपवाल्यांकडून आचारसंहितेची ऐशी की तैशी झाल्याने निवडणूक आयोगाची डोकेदुखी वाढली आहे. आमदार गीता जैन यांचा मावसभाऊ सुनील जैन यांनी रिक्षाचालकांना टिफिन वॉक्सचे वाटप केले आहे, तर नरेंद्र मेहता यांचे समर्थक भाजपचे जिल्हाध्यक्ष किशोर शर्मा यांनी कोणतीही परवानगी न घेता मीरा रोड येथील सेंट्रल पार्कमध्ये कार्यक्रम घेतला आहे. या दोन्ही प्रकरणात भाईंदर आणि मीरा रोड पोलीस ठाण्यात आचारसंहिता भंगाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
आमदार गीता जैन यांचे मावसभाऊ आणि रुद्र फाऊंडेशनचे अध्यक्ष सुनील जैन यांनी रिक्षाचालकांना टिफिन बॉकरचे वाटप केले. त्यानंतर त्या ठिकाणी आलेल्या रिक्षांवर ‘सक्षम मीरा-भाईंदर की एक ही पुकार फिर एक बार गौता आमदार, पाच साल सुख-शांती और चैन फिर एक बार गीता भरत जैन’, असे मजकूर असलेले पोस्टर्स लावले. भाजप जिल्हाध्यक्ष किशोर शर्मा यांनी मीरा रोडच्या एस. के. स्टोन येथील सेंट्रल पार्क येथे भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या समर्थनात लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम घेतला. मात्र या कार्यक्रमाला परवानगी नव्हती.
‘रायगडात 120 उमेदवारी अर्जाची विक्री
अलिबाग विधानसभा निवडणुकीसाठी मंगळवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून पहिल्या दोन दिवसांत जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघात एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. मात्र आतापर्यंत जिल्ह्यात 120 उमेदवारी अर्जाची विक्री झाली आहे. सर्वांत जास्त 29 उमेदवारी अर्जाची विक्री पनवेल विधानसभा मतदारसंघात झाली आहे. जिल्ह्यात पनवेल, उरण, कर्जत, पेण, अलिबाग, श्रीवर्धन, महाड हे सात विधानसभा मतदारसंघ आहेत. निवडणुकीसाठी उमेदवारांना 22 ते 29 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे. मात्र पहिल्या दोन दिवसांत जिल्ह्यात एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही, जिल्ह्यात 120 उमेदवारी अर्जाची विक्री झाली असून पनवेल 29, तरण 22, कर्जत 18, पेण 11, अलिबाग 16, श्रीवर्धन 13, महाड 11 उमेदवारी अर्जाची विक्री करण्यात आली आहे. उमेदवारी अर्जाची छाननी 30 ऑक्टोबर रोजी करण्यात येईल, तर 4 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेण्याची मुदत देण्यात आली आहे.
कर्मचारी प्रशिक्षणास गैरहजर असलेल्या 249 शिक्षकांवर कारवाईचा बडगा
भाईंदर विधानसभा निवडणूक आचारसंहिता दरम्यान कर्मचारी प्रशिक्षणास गैरहजर असलेल्या 249 शिक्षकांवर मीरा-भाईंदर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. निवडणुकीच्या कामकाजात टाळाटाळ करणाऱ्या या शिक्षकांना पकडून तत्काळ मीरा-भाईंदर 145 मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर हजर करण्याचे आदेश सहाही पोलीस ठाण्याच्या बरिष्ठ पोलीस निरीक्षकांना दिले आहेत.
145 मतदारसंघातील निवडणुकीचे काम करण्यासाठी विविध शाळांमधील 368 शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. निवडणूक प्रक्रियेच्या प्रशिक्षणासाठी उपस्थित राहण्याचे आदेश शिक्षकांना बजावण्यात आले होते, परंतु सदर कर्मचारी प्रशिक्षणादरम्यान काशिमौरा येथील 132 पैकी 128, नयानगरमधील 20, नवघर येथील 63 पैकी 61, उत्तन येथील 11, भाईंदर येथील 30 पैकी 29, मीरा रोडमधील 112 शिक्षक गैरहजर होते. त्यामुळे गैरहजर असलेल्या 249 शिक्षकांना कोणत्याही परिस्थितीत हजर करण्याचे आदेश निवडणूक निर्णय अधिकारी सुनील भुताळे यांनी पोलिसांना दिले आहेत.
Maharashtra election 2024 – भाजपच्या स्नेहा पाटील रिंगणात; भिवंडीत मिंध्यांना टेन्शन
खर्च निरीक्षकांनी घेतला आढावा
रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघासाठी नेमलेल्या दोन निवडणूक खर्च निरीक्षकांनी आज निवडणूक यंत्रणेचा आढावा घेतला. पनवेल, पेण, कर्जत, उरण मतदारसंघासाठी राजेश कुमार तर अलिबाग, श्रीवर्धन आणि महाड मतदारसंघांसाठी ज्योती मीना यांची नियुक्ती केली आहे. यावेळी राजेश कुमार यांनी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापकांनी निवडणूक प्रक्रियेदरम्यान बँकांमध्ये होणारे दैनंदिन व्यवहार, संशयास्पद व्यवहारांवर विशेष लक्ष द्यावे. तसेच विधानसभा क्षेत्रनिहाय अतिसंवेदनशील भागाविषयी माहिती जाणून घेतली. तसेच उत्पादन शुल्क विभाग, आयकर अधिकारी, वनपरिक्षेत्र अधिकारी यांना सूचना देतानाच इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातींकडे लक्ष देण्याबाबत जिल्हा माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीव्या नोडल अधिकाऱ्यांना निर्देश दिले.