Maharashtra election 2024 – निवडणूक कामासाठी गैरहजर राहणाऱ्या 7 लिपिक, 5 शिक्षकांसह 13 कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा

इलेक्शन ड्युटी लावूनही कर्तव्यावर हजर न झालेल्या 13 शासकीय कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये सात लिपिक, पाच शिक्षक आणि एका प्रयोगशाळा तंत्रज्ञाचा समावेश आहे.

औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी उमाकांत पारधी यांच्या आदेशावरून नायब तहसीलदार मुकुंद उन्हाळे यांनी वेदांत नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून हा गुन्हा दाखल झाला आहे.

शिक्षण उपसंचालक कार्यालयातील लिपिक अमोल सोनवणे, आरोग्य उपसंचालक कार्यालयातील कनिष्ठ लिपिक अमोल ताठे, क्षेत्रीय डेरी विकास अधिकारी कार्यालयातील लिपिक मोगल मोईज बेग, लघु पाटबंधारे विभाग विभागातील कनिष्ठ लिपिक योगेश कुलकर्णी, लघु पाटबंधारे विभागातील लिपिक स्वप्निल कुलकर्णी, महापालिकेतील लिपिक प्रदीप जाधव, मिर्झा अकबर बॅग, प्रयोगशाळा तंत्रज्ञ शेख शौकत नबी, मोईन उल उलूम शाळेतील शिक्षक सय्यद इर्शाद, रियाज शेख, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विद्यालयातील टी. एस. चव्हाण, ज्ञानेश्वर कड, अनंत भालेराव विद्यामंदिर शाळेतील शिक्षिका नंदा राठोड यांच्या विरोधात कलम 32, 134, लोकप्रतिनिधी अधिनियम 1950 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.