वार्तापत्र (बेलापूर) – चौरंगी लढतीत संदीप नाईक यांचे पारडे जड

बेलापूर विधानसभा मतदारसंघात दोन बंडखोर – निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यामुळे चौरंगी लढत रंगणार आहे. मिंधे – गटाने केलेल्या बंडखोरीने विद्यमान आमदार आणि भाजपच्या उमेदवार मंदा म्हात्रे यांची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे या चौरंगी – लढतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप नाईक हे बाजी मारणार आहेत. नाईक यांच्या प्रचार रॅली आणि प्रचार – सभांना मतदार आणि तरुणांचा – चांगला प्रतिसाद मिळत असल्याने विरोधकांच्या गोटात पळापळ उडाली आहे.

बेलापूर मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी संदीप नाईक यांनी गेल्या पाच वर्षांपासून जोरदार मोर्चे बांधणी केली होती. मात्र भाजपने दगाफटका करीत यंदाही विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे संदीप नाईक यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. त्यांना महाविकास आघाडीची उमेदवारी मिळाली. त्यांच्या या उमेदवारीचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने स्वागत करून प्रचारही सुरू केला. या उलट महायुतीमध्ये मात्र वादाचा भडका उडाला आहे. मिंधे गटाचे विजय नाहटा यांनी बंडाचा झेंडा फडकावला आहे. नाहटा यांनी निवडणूक लढवण्याची भूमिका कायम ठेवली. परिणामी मंदा म्हात्रे यांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे.

मते मिळवण्यासाठी मिंध्यांची ‘शो’बाजी; ‘धर्मवीर’नंतर आता त्यांच्या गाडीचा वापर

संदीप नाईक बाहेर पडल्यामुळे बेलापूरमध्ये भाजपची अवस्था केविलवाणी झाली आहे. भाजपच्या सुमारे 28 माजी नगरसेवकांनी तुतारी हाती घेतली आहे. मोठ्या संख्येने पदाधिकारी नाईक यांच्याबरोबर राष्ट्रवादीत आल्याने भाजपचा तंबू रिकामा झाला आहे. उद्योजक डॉ. मंगेश आमले यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र त्यांना यश आले नाही. त्यामुळे तेही निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. परिणामी बेलापूरमधील लढत चौरंगी बनली आहे. बेलापूरमधील लढत ही 2014 प्रमाणे अटीतटीची होणार असली तरी या चौरंगी लढतीमध्ये संदीप नाईक यांचे पारडे जड असणार आहे.

वार्तापत्र (बोईसर) – विलास तरेंच्या कोलांटउड्यांना नागरिक कंटाळले; शिवसेनेचे डॉ. विश्वास वळवी बाजी मारणार